Monday, August 10, 2009

बदल...

आज घरात फोटोंचा अल्बम पहात होते... जुन्या काही आठवणी या निमित्ताने पुन्हा एकदा जाग्या झाल्या... आणि एक लक्षात आलं की, आपण आणि त्या फोटोत असलेले आजूबाजूचे किती बदलले आहेत....मग विचार करु लागलो तसं जाणवलं की हा बदल बदल फक्त पेहरावात, उंचीत, जाडीत असा मोजता येणार नाही तर त्याबरोबरच विचारही बदलत गेले आहेत.. मी, माझे कुटुंबिय, मित्र मंडळी, राहतो ते गाव... बाहेरचं विश्व हे सगळचं बदलत गेलेले आहे... म्हणजेच थोडक्यात बदल हा जगाचा स्थायीभाव आहे...
अगदी काही महिन्यांपूर्वीचा मी आणि आत्ताचा मी यातही किती बदल झालाय, हे जाणवलं आणि झपाट्यानं बदल हा शब्द मला आव्हानात्मक वाटायला लागला...
आता विचार करताना जाणवतं की हा बदल फक्त माझ्यापुरता नाही, तर आसपासच्या नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये, आपल्या जवळच्या असणा-या वक्तींमध्ये सगळ्यांमध्येच झालाय.. अगदी काही क्षणांपूर्वी जगलेले क्षण आपण तसेच पुन्हा नाही जगू शकतं..
उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा सिनेमा किंवा एखादं पुस्तक वाचताना पहिव्यांदा आपणं ज्या तन्मयतेने आपण वाचतो..तेच दुस-यांदा वाचताना आपण त्या स्थितीला नसतो... कधीकधी ते वाटन किंवा पहाणं कंटाळवाणं होतं.. किंवा त्यातून अधिक काही तरी भरीव आपल्या हाती येतं..जे कदाचित गेल्यावेळी आपल्या पहाण्यातून किंवा वाचनातून निसटलेलं असतं... म्हणजेच आपण अधिक समृद्ध झालो असून तरच काहीतरी भरीव आपल्या येतं असचं काहीतरी...
... मग हा बदल खरचं समृद्ध करणारा असतो का.. की काही चांगल्या वाईट अनुभवामुळे आपण बदलत जातो... ते तर आहेच ते ओघाने होणारच मात्र कोणता अनुभव तुमच्या मनावर किती मोठा आघात करेल.. किंवा एखादी चांगली आठवण देऊन तुम्हाला समृद्ध करेल यावर हा बदल अवलंबून आहे.... माझ्यामते असे समृद्ध होणारे फार थोडके आपल्याकडे असतील...
प्रपंचात पडल्यावर येणा-या जबाबदा-या, व्यवहार, नोकरीतला तोच तोच पणा यातून माणसं कशी टिकतात याचंही मला कोडं आहे... बर सरावलेलं काम पुन्हा पुन्हा करण्यात काय आनंद आहे..त्यापेक्षा एखादं आव्हान तुम्हाला कायमचं माफ करा नेहमी नेहमी म्हणजे क संपल्यावर दुसरं अशा क्रमाने का मिळत नाही... खरतरं माझ्यामते या अश्या आव्हानातून आपण अधिकाधिक समृद्ध होतो..
माझ्यापुरता विचार केला तर मी गेल्या आठ-दहा वर्षात अफाट बदललो..काही चांगल्या अर्थी आणि ब-याचश्या वाईट अंशी... मग आता पुढे काय.. असा प्रश्न कधीतरी पडतो आणि अधिक अडचणीत साप़डतो... हा बदल मान्य... मागे एकदा मेघना पेठेंच पुस्तक वाचताना अंधळ्यांच्या गाई वाचताना त्यातलं हेच मला विशेष जाणवलं.. त्यांनी त्या पुस्तकांच्या कुठल्यातरी एका कथेत नमेकं हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता.. मग हा बदल आपण कश्याप्रकाराने घ्यावा..
उदाहरण देतो मी जिथे लहानपण घालवलं.. त्या गावात मी सुमारे 12-14 वर्षाने पुन्हा गेलो.. माझ्या मनात माझं आधीचचं गाव होतं.. आणि ते अगदी जस्सच्या तसं असावं असं मला वाटत होतं.. माझी शाळा, गावाची रचना, मात्र या सगळ्यांचा गेल्या काही वर्षांत इतका विस्तार झाला की आता ते माझं गाव आहे, हेच मला पटेनासं झालं... आणि मनातनं खूप वाईट वाटलं.. त्या काळी खूप मोठ्ठ वाटणार गावं आता मला अगदीच लहानही वाटू लागलं... आणि त्याचंही खूप वाईट वाटलं.. आता यावर उपाय काय तर पुन्हा फिरुन तिथे जायचं नाही असा निर्णय मी घेतला... म्हृणजे माझ्या मनातलं गाव मात्र तसाच राहिल यासाठी..
माणसं बदलणं हे लक्ष चागलंच त्यात त्यांचा विकास आहे, समृद्धी आहे मात्र त्याचबरोबर काही जुने बंध मात्र तुटत जाणं, हे किती चांगंल हा प्र्न मला नेहमी पडतो.. माझा एक चुलतभाऊ अमेरिकेत असतो..त्याची आणि माझी खास मैत्री होती, म्हणजे जाण्यापूर्वी.. अगदी सख्ख्या भावासारखी.. आम्ही ब-याच ब-या वाईट गोष्टी एकमेकांकडे शेअर करत असू ... आता मात्र गेल्या सात आठ वर्षांत त्याचे काही फोन सोडले तर त्याचा माझा संपर्क नाही.. आणि त्याच्या आणि माझ्या
या बदलांत आता मात्र आम्ही एकदम भिन्न काठांवर तर पोहचलो नाहीयेत ना..
मग मला वाटतं अशी माणसं बदलणं कितपत योग्य की ज्यामुळे तुमच्यातले धागेच तुटले जातील.. गेल्या सात-आठ वर्षांत मी अशी कितीतरी अगदी जिवाभावाची माणसं गमावली.. म्हणजे सगळे आहेत आजूबाजूलाच पण आता तो धागा राहिला नाही.. असं का व्हावं.. कदाचित बदल हेच त्याचं मुख्य कारण असावं..
तर हा सातत्यानं होणारा बदल आणि विसर्जन या दोन गोष्टी मी गेल्या काही वर्षांत अगदी आवर्जून अनुभवल्यात हे खरं.. आता यातल्या विसर्जनाबबात पुन्हा कधीतरी..