Monday, December 21, 2009

गडकरींनी दिल्लीत जाणे योग्य आहे का ?


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याच्या रुपाने आपलं राजकीय करिअर सुरु करणारे नितीन गडकरी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत.. एम कॉम, एल. एल. बी आणि डीबीएम यासारख्या विषयांचे पदवीधारक असणारे गडकरी यांची महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील ओळख एक व्हिजन असणारा नेता अशी आहे. त्यांची खरी ओळख देशाला झाली ती मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या बांधकामानंतर.. अनेक आव्हानांचा सामना करत चॅलेंज स्वीकारत आणि नोकरशाहीत नवे पायंडे पाडत त्यांनी हा मार्गा खुला करुन दिला आणि ते एकदम प्रकाशझोतात आले.. युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार सांभाळणा-या या कार्यक्षम मंत्र्याचं तेव्हाही अनेकांनी कौतुक केलं. गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी पावती त्यांना खुद्द बाळासाहेब आणि आत्ताच्या विधानसभा निवडणूक काळात राज ठाकरेंनीही दिली

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेसह त्यांनी बांधलेल्या उड्डाणपुलांनी त्यांची ख्याती संपूर्ण देशात पोहचवली.. आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा सर्वजण मुराठीच्या मुद्दावर बोलत होते, तेव्हा एकटे नितीन गडकरी हे विकास, ऊर्जा, मोठे प्रकल्प, शेतकरी आत्महत्या यासारख्या विषयांवर आपले विचार मांडत राज्यात फिरत होते. गडकरींची मी आतातापर्यंत जी जी भाषण ऐकली आहेत किंवा त्यांच्या मुलाखती ऐकल्या आहेत त्यात त्यांनी अनेक आजच्या काळात क्रांतीकारक वाटतील असेच विचार मांडले आहेत.. त्यातूनच त्यांनी स्वत:च्या राजकीय प्रगतीबरोबरच अनेक उद्योगांमध्येही स्वत:चा वेगळा ठसा उमटवलाय. अशा राज्यातल्या एका चांगल्या नेत्याची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणे ही नक्कीच चांगली बाब आहे.. निश्चितच विश्वासार्हही आहे.. त्यातचही त्यांची सर्व पक्षांतील नेत्यांशी असणारी मैत्री आणि विकासासाठी कोणतंही पाऊल उचलण्याची जोखीम हाही त्यांच्या जमेचाच भाग आहे.. याहीपेक्षा अत्यंत निष्कलंक चारित्र्य अशीही त्यांची संपूर्ण परिवारात ओळख आहे... त्यामुळेच त्यांच्या या इमेजचा सध्या डबघाईला आलेल्या भाजपला निश्चितच फायदा होणार आहे.. लोकसत्तात सुनील चावके यांनी लिहल्याप्रमाणे शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्याहीपेक्षा गडकरी आज वरिष्ठ पातळीवर पोहचले आहेत.. आत्तापर्यंत या झाल्या जमेच्या बाजू..
मात्र वैयक्तिक गडकरी यांना दिल्लीत जाण्याने कितपत फायदा होईल, याबाबत मी साशंक आहे.. अजून काही वर्ष तरी त्यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय असायला हवं होतं, असंही माझं वैयक्तिक मत आहे.. दिल्लीत भाजपला त्यांच्या इमेजचा फायदा होणार असला तरी गडकरींच्या समोर मात्र अनेक मोठी आव्हानं उभी राहणार आहेत.. त्यातून ते सफल झाले तर त्यांचा जयजयकार होईल खरा, मात्र यापुढची भाजपचे सर्व पराभव हे एकट्या ग़डकरींच्या माथी मारले जाण्याची शक्यताही तेवढीच अधिक आहे. एवढं मोठं कार्य करुन संघ शरण असणा-या गडकरींना, सरसंघचालक मोहन भागवतांच्या म्हणण्यानुसार अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, पक्षातील दिल्लीतल्या इतर वरिष्ठ नेत्यांकडून मिळणा-या असहकार्याला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.. त्यातही उत्तर भआरतीय लॉबीत मराठी माणसाला टिकून राहण्याचं आव्हानही त्यांच्यासमोर असणार आहे.. आणि यात ते यशस्वी ठरले तर त्यांना मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही, मात्र यात जर ते अपयशी ठरले, तर त्यांना राज्याच्या राजकारणातही एकदम पिछाडीवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे..
हा माणूस खूप चांगला आहे... सध्याच्या राजकीय नेत्यांमध्ये त्यांच्याकडे असणा-या व्हिजनमुळे ते उठून दिसणारे आहेत..म्हणूनच त्यांचे दिल्लीला जाणे हे काळजी वाटण्यासारखे आहे.. इतकेच.. गडकरी खवय्ये आहेत असं ऐकून आहे.. ते विदायर्थी परिषदेच्या कामातून गेले असल्याने स्वाभाविक त्यांच्याविषयी एक आपुलकी आहे.. त्यामुळेच असा चांगला नेता इतक्यात महाराष्ट्रातून जायला नको होता, अशी माझी भावना आहे.. मात्र गडकरी ही सर्व आव्हान पेलतील, तेवढा आत्मविश्वास त्यांच्यापाशी आहे, त्यामुळे या निर्णयावर तेही पूर्ण विचारांती आले असतील.. असं आपण मानूया आणि त्यांच्या आगामी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊयात.. कारण एवढचं आपल्या हाती आहे.

Tuesday, December 8, 2009

अपेक्षा एका मोठ्ठ्या सुट्टीची














एखाद्या छानश्या समुद्रकिना-यावर...



कुठतेरी दूर डोंगरात धुक्यात एखाद्या नदीच्या काठावर...



कुणाशीही संवाद न साधता येईल, मोबाईलची रेंज पोहचत नसलेल्या एखाद्या



हिरव्यागर्द किल्ल्यावर..



दूर कुठेतरी चारचाकी गाडीत रस्त्यातल्या शेतातल्या धान्यांचा वास घेत



सुरु असलेल्या प्रवासावर...



दूर कुठेतरी पोटभर भाताच्या जेवणानंतर, पाड्यावर पडलेल्या खाटेवर..



दूर कुठेतरी लाल डब्ब्याच्या गाडीत एकटाच थंडीला शालीत लपेटून घेत



झोपेला आवर्जून बोलणा-या डोळ्यांवर...



दूर कुठेतरी चांदण्यांच्या आवारात, शेतात पडल्या पडल्या



सुरु असलेल्या आकाश निरीक्षणावर..



दूर कुठेतरी जिथे निसर्गाच्या ओकारांचा आवाज



कानात भारुन राहील अशा ठिकाणावर..



दूर कुठेतरी आत्ताच्या या जगण्याच्या सगळ्या आणि सगळ्याच



माणसांच्या चेह-यातून डोळ्यांतून, विचारांतून...



दूर कुठेतरी...दूर कुठेतरी...



गरज एका खूप खूप खूप मोठ्ठ्या सुट्टीची ...