Tuesday, October 20, 2009

संपली बाबा निवडणूक




विधानसभा निवडणुकीच्या क्लायमेक्सला अवघे काही तास राहिले आहेत.. खरं तर मतदान झाल्यानंतर लगेचच हा ब्लॉग लिहणं जाता जाता अपेक्षित होतं. मात्र कार्यबाहुल्ल्यात ते राहून गेलं.. म्हणजे सुरुवातीपासून कोणताही प्रचाराचा मुद्दा नसलेली आणि राज ठाकरे यांच्याभोवतीचं ही निवडणूक आणि तिचा प्रचार फिरत राहिला.. सोनिया गांधी आणि खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही जिथे राज यांचा उल्लेख करावा लागला..ते पाहता राज यांचा मराठीचा मुद्दा या निवडणुकीत किती प्रभावी होता, हे लक्षात येईल.. शरद पवारांनीही जाता जाता म्हणजे मतदानाच्या दिवशी राज यांचं कौतुक करुन एक राजकीय पर्याय राष्ट्रवादी समोर खुवला असल्याचं अप्रत्यक्ष सांगत, मनसेशी युती करणार नसल्याचाही दिलासा दिला..


असो या निवडणुकीत गंमत अशी फारशी दिसली नाही.. त्यातही पूर्वीच्या काळी असलेली पक्ष निष्ठा वगैरे किती कमर्शिअल झाली आहे ते सगळीकडेच पहायला मिळालं.. तिकीट मिळालं नाही तर दुसरा पक्ष किंवा तोही नाही मिळाला तर व्हा बंडखोर.. यांचं पीक किती अफाट होतं.. उदा. अण्णा जोशी, विनय नातूंसारख्या माणसांवर झालेला अन्याय.. अशी कितीतरी उदाहरणे आणि या सा-याचा राजकीय गणितावंर होणारा परिणाम पाहण्यासाठी आत्तातरी आपल्याला आणखी दोन दिसांची वाट पहावी लागणार आहे..
पहिल्यापासूनच माझ्या मते ही निवडणूक एकतर्फी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची होती.. त्यांच्या दहा वर्षांच्या पापाचं कोणतंही चीज विरोधी पक्षातील कोणीही करु शकलं नाही.. आणि लोडशेडिंग, शेतकरी, पाणी, रस्ते थोडक्यात विकास या मुद्द्यावर अपेक्षित असणारा प्रचार दुर्देवाने मराठीच्या मुद्द्याभोवती फिरत राहिला.. प्रसारमाध्यमांमध्येही फक्त राज ठाकरे हेच प्रामुख्याने दिसून आले..त्याची त्यांची गणित वेगळी असली तरी त्याचा परिणाम मात्र व्हायचा तोच झाला.. म्हणजे विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्षच झालं..
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना यांच्यातील अनेक नेत्यांना यंदा गेल्या वेळेप्रमाणे ग्लॅमर मिळालचं नाही..खुद्द पवारांनाही हेही सगळ्यांनाच मान्य करावं लागले.. त्यातच आघाडीसाठी झालेला उशीर, मग तिकीट वाटपातील मारामारी आणि मग बंडखोरांची संकट यातच त्यांचा निम्मा जीव दडपून गेला..हे तर त्यांनाही खाजगीत मान्य होईल..
त्यातल्या त्यात एकमेक भाजपचे नितीन गडकरी यांनी काय तो हा मुद्दा पहिल्यापासून लावून धरला... हे विशेष..
या निवडणुकीत महत्वाचं म्हणजे निवडणुकीला एक ग्लॅमर विनाकारण प्राप्त झालय. अनेक सेलिब्रिटी नाहक या राजकारणात उतरले आणि त्याचा परिणाम ज्यांना खरोखरच प्रसिद्धी मिळायला हवी त्यांच्या फटक्यात झाली..
आणखी एक म्हणजे या निवडणुकीत झालेल्या मारामा-या परवाच मी मोजल्या तर तब्बल 10 ते 15 या रेंजमध्ये गोळीबार, मारहाणी यासारख्या घटना या निवडणुकीत घडल्या.. राज्याच्या सत्तेची निवडणूक किती महत्वाची आहे हे यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं..
रिडालोस हा तिस-या आघाडीचा प्रयोग यावेळी वेगळा म्हणावा असा ठरला.. मात्र त्यांचा प्रभाव किती जागांवर पडेल.. या बाबत मात्र काही अंशी शंका आहे..
आता निकाल काय लागतील हे महत्वाचं
माझ्या मते
काँग्रेस आघाडी- 120 ते 130 दरम्यान ( काँग्रेस65 ते 70, राष्ट्रवादी 55 ते 60)
शिवसेना भाजपा- 110 ते 120 ( शिवसेना 60 ते 65, भाजप 50 ते 55)
मनसे- 8 ते 10
रिडालोस- 5 ते 8
बंडखोर - 15 ते 20
पाहुयात काय होतय ते..
एक मात्र खरं की सरकार काँग्रेस आघाडीचेच येणार..

No comments: