Saturday, April 26, 2008

सुरुवातीला थोडसं...

मी काही लेखक नाही, किंवा अभ्यासूही नाही.. मी एक सामान्य माणूस आहे..
पण माझ्या जगण्यात मी जे काही बघतो, पाहतो,
मला जे सुचतं.. मला जे भावतं.. जे कुठेतरी आत अंतर्मुख करतं..
किंवा ज्यापुढे मला वाकावसं वाटतं.. अश्या काही आदर्शांची काही प्रसंगाची
काही सर्जनाची कुठेतरी नोंद व्हावी, असं फार आतून वाटतं..
ते कुठेतरी उतरवायला हवं.. असंही फार आतून वाटतं..
आताशा ही गरज जास्त वाटते.. यातनं काही अनुभव शेअर करता येतात का,
काही अधिक चांगलं पदरात पडेल का.. या सगळ्याचा हा शोध आहे..
कदाचित स्वत:चाही.. सगळ्यांसमोरचा..
बघुयात काय पदरात पडतयं ते..

2 comments:

अमोल परांजपे said...

masta re... blogchi idea chan aahe. lihilayas pan changala...

Ha tuza ARAMBHASHURPANA tharu naye, hich shubhecchha....

lihit raha.

Vinod Patil said...

खरच स्वत:चा शोध घेण्याचं लेखन हे उत्तम माध्यम आहे हे मानलं बुवा. लेखनानं मानुस खरच अतर्मुख होतो. आणि अंतर्मुख झाल्या शिवाय स्वत:चा शोध घेणं केवळ अशक्य. तुमच्या शोधाच्या सफरीला माझ्या शुभेच्छा. पण शोध लागल्यावर काय हाती आले ते जरूर कळवा.