Tuesday, December 8, 2009

अपेक्षा एका मोठ्ठ्या सुट्टीची














एखाद्या छानश्या समुद्रकिना-यावर...



कुठतेरी दूर डोंगरात धुक्यात एखाद्या नदीच्या काठावर...



कुणाशीही संवाद न साधता येईल, मोबाईलची रेंज पोहचत नसलेल्या एखाद्या



हिरव्यागर्द किल्ल्यावर..



दूर कुठेतरी चारचाकी गाडीत रस्त्यातल्या शेतातल्या धान्यांचा वास घेत



सुरु असलेल्या प्रवासावर...



दूर कुठेतरी पोटभर भाताच्या जेवणानंतर, पाड्यावर पडलेल्या खाटेवर..



दूर कुठेतरी लाल डब्ब्याच्या गाडीत एकटाच थंडीला शालीत लपेटून घेत



झोपेला आवर्जून बोलणा-या डोळ्यांवर...



दूर कुठेतरी चांदण्यांच्या आवारात, शेतात पडल्या पडल्या



सुरु असलेल्या आकाश निरीक्षणावर..



दूर कुठेतरी जिथे निसर्गाच्या ओकारांचा आवाज



कानात भारुन राहील अशा ठिकाणावर..



दूर कुठेतरी आत्ताच्या या जगण्याच्या सगळ्या आणि सगळ्याच



माणसांच्या चेह-यातून डोळ्यांतून, विचारांतून...



दूर कुठेतरी...दूर कुठेतरी...



गरज एका खूप खूप खूप मोठ्ठ्या सुट्टीची ...





1 comment:

प्रसाद साळुंखे said...

खरंच सुट्टी घेतल्यासारखं वाटलं कविता वाचून